भरतमुनिविरचितं नाट्यशास्त्रम् ।
पदच्छेद आणि अन्वयासह मराठी अनुवाद
पदच्छेद आणि अन्वयासह मराठी अनुवाद
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे एक अनोखा सोहळा 27 फेब्रुवारी 2017 रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे संपन्न झाला. मराठी सिनेतारकांनी सजलेल्या या कार्यक्रमात अनेक मराठी कवी आणि लेखकांना विविध पुरस्कारांनी गौरविले गेले. त्याच सोहळ्यात 11 नवीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यांपैकी एक होते भरतमुनिविरचित नाट्यशास्त्राच्या मराठी अनुवादाचा पहिला खंड. हा अनुवाद केला आहे डाॅ. संध्या पुरेचा आणि श्री. श्रीहरी गोकर्णकर यांनी.
यात 1 ते 12 अध्याय समाविष्ट आहेत. अभ्यासकांच्या सोयीसाठी पदच्छेद आणि अन्वय देऊन त्यानंतर मराठी भाषांतर दिले आहे. अशा स्वरूपाचे कार्य मराठी भाषेत आजतागायत झालेले नाही. म्हणून या कार्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी छापल्याने त्याचे महत्त्व द्विगुणित झाले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्वानांनी याचे अध्ययन करून आपला अभिप्राय आणि सूचना नक्की कळवा म्हणजे पुढील खंडात त्यांचा समावेश करता येईल.
सर्व गुरुजनांना माझे शिरसा अभिवंदन.
श्री. श्रीहरी गोकर्णकर
Post a Comment