Tuesday, 28 February 2017

हो... तीच मी



हो... तीच मी
                   श्रीहरी
 

अखिल मानवजातीला मी आहे एक वरदान..  
 माझ्यामुळेच सृष्टी घडते मी विश्वाचा प्राण..


माझ्या सौंदर्याऽऽपुढे ते शूरवीर झुकतात...
 सज्जन साधू ऋषीमुनीही माझे गुण गातात..


गती माझी आकर्षक अन् चाल डौलदार..
माझे पदलालित्य पाहुनि झाले किती बेजार..


माझ्या नयनडोहामध्ये किती आकंठ बुडाले..  
माझ्या कोमल स्पर्शाने कित्येक सुखावले..


पण आहे मी शिस्तप्रिय माझ्या नियमांनी बद्ध..  
स्वैरपणे मी ना फिरते मी नाही छंदिष्ट..


तालबद्ध मी आहे नित्य, मधुरपाक मी आहे..  
नृत्य वाद्य अन् संगीताला अनुकूल मी आहे..


भरगच्च लोकलमधून बाहेर पडलेली मी नाही..  
नीटनेटकेपणात आहे माझे सौंदर्य..


मी भामिनी मी स्वामिनी मी आहे दामिनी..  
सर्वांच्या हृदयामध्ये वसणारी मी कामिनी..


ना उर्वशी ना मेनका मी नाही शकुन्तला..  
प्रतिभेतून जन्माला आलेली मी ती एक कविता..



About the Author

Shreehari Gokarnakar

Author & Editor

He is a Teacher and researcher in Sanskrit language.

Post a Comment

 
SANSKRIT SHREE: © 2015 - Blogger Templates Designed by Templateism.com