Showing posts with label marathi poetry. Show all posts
Showing posts with label marathi poetry. Show all posts

Sunday, 23 August 2020

 

धाव रे गणराया..

Lalbaugh cha Raja 2020 | Dhaav re Ganaraya | Official Music Video ...

काय तुला सांगू देवा, व्यथा माणसाची
फाटलं आभाळ माथी, काळ घास घेई..
तूच विघ्नहर्ता आमचा, तूच आमचा वाली..
तुझ्या लेकरांवर आले, संकट हे भारी

आण तू किनारी, जीवनाssची,
नाव रे गणराया....
अरे धाव रे गणराया..
आता पाव रे गणराया..
तुज वाचून नाही कोणी
आम्हांसी सावराया...
गजानना हे गजानना
दैत्यनाशका गजानना..
गजानना.. गजानना
प्रलयशामका गजानना..
गजानना.. गजानना
क्लेशनाशका गजानना..
सुरमुनिबालक-जनगणपालक
दुष्टहारका गजानना.. 1..


धुके दाटले तमाचे, वाट ही दिसेना
शंखचक्रशस्त्रधारी, तूही अवतरेना
सेवा अहोरात तरीही, संकट सरेना
आळवितो देवा तुजला, आतातरी ये ना
वाट ती आम्हां, ज्योतीची रे,
दाव रे गणराया....

अरे धाव रे गणराया..
आता पाव रे गणराया..
तुज वाचून नाही कोणी
आम्हांसी सावराया... (2)

गजानना हे गजानना
दैत्यनाशका गजानना..
गजानना.. गजानना
प्रलयशामका गजानना..
गजानना.. गजानना
क्लेशनाशका गजानना..
सुरमुनिबालक-जनगणपालक
दुष्टहारका गजानना.. ..

सौख्यवर्धका गजानना.. दुःखहारका गजानना.. भुक्तिदायका गजानना. शक्तिदायका गजानना.. भक्ततारका गजानना.. इष्ट देव तू गजानना.. सर्वरोगसंहारक देवा मुक्तिदायका गजानना..

सकलविघ्ननाशाय पूजितः सुरमानवैः ।
शरण्यः सर्वजीवानां नमामो गणनायकम् ।।


Video by PINEAL ENTERTAINMENT NETWORKS PVT LTD Cinematography, Drone, Editing : Shreepad Gaonkar @Shreepad Gaonkar Song Composition & Lyrics :Shreehari Gokarnakar @Sanskritshree Team Pineal : Riddhima Savant, Prathmesh Mhaske, Vasant Pednekar, Vinay Bhosale, Amrutesh Patil. Singer - Keval Walanj @Keval Walanj Programmer/Arranger - Vikaas Vishwakarma Additional Vocals - Yogita Walanj Recorded, Mixed & Mastered by W Keval Jaywant @MixTune Music





Dhav re Ganaraya.

Saturday, 2 May 2020





येशील ना?

आठव तुझी, दाटे मनी
हूरहूर ती, हृदयातही
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी


स्मरते मला अजुनि, भेट आपुली,
भेट कोवळी ती, पावसातली...
अंग अंग चिंब ओले, जीव धुंदले,
धडधड उरात दोन्ही, श्वास रोखुनि..
तू श्वास रे, होऊन जिवा
येशील ना, माझ्या उरी
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी

स्मरतो मला अजुनि, तो चांदवा,
तो गारवाऽ अन् तो मारवा..
शिंपूनिया सडा जो, होई बावरा
प्राजक्त कोवळा काऽ, स्मरतो तुला?..
वा-यासवे, गंधाळुनी..
देशील का, संजीवनी..
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी..
Audio Credits:-
Singer & Composer: KEVAL WALANJ Music programmer: SANGEET PATIL Lyrics: Dr. SHREEHARI V. GOKARNAKAR
Song Recorded, Mixed & Mastered By:
W KEVAL JAYWANT @MIXTUNE MUSIC Video Credits:- Produced by: REDBULB MOVIES PVT. LTD Direction, Cinematographer: ABHISHEK JAWKAR Executive Producer: NIKHIL PUNAMIYA (REDBULB MOVIES PVT. LTD.) Editor: ABHISHEK JAWKAR Featuring: PALLAVI PATIL Stylist: NIMISHA JADHAV Asst Director: DIVYA BHARTI Make up: JAMIL AHMED Hair: FATIMA KHAN PR & Markeing: KARTIKEE YADAV (MEDIABUZZ PR) Red Bulb Music Team: DIVYA, ANKIT, RUPESH Publicity Design: BRIJESH DEDHIYA Post Production: REDBULB STUDIOS LLP

येशील ना?

Tuesday, 28 February 2017



हो... तीच मी
                   श्रीहरी
 

अखिल मानवजातीला मी आहे एक वरदान..  
 माझ्यामुळेच सृष्टी घडते मी विश्वाचा प्राण..


माझ्या सौंदर्याऽऽपुढे ते शूरवीर झुकतात...
 सज्जन साधू ऋषीमुनीही माझे गुण गातात..


गती माझी आकर्षक अन् चाल डौलदार..
माझे पदलालित्य पाहुनि झाले किती बेजार..


माझ्या नयनडोहामध्ये किती आकंठ बुडाले..  
माझ्या कोमल स्पर्शाने कित्येक सुखावले..


पण आहे मी शिस्तप्रिय माझ्या नियमांनी बद्ध..  
स्वैरपणे मी ना फिरते मी नाही छंदिष्ट..


तालबद्ध मी आहे नित्य, मधुरपाक मी आहे..  
नृत्य वाद्य अन् संगीताला अनुकूल मी आहे..


भरगच्च लोकलमधून बाहेर पडलेली मी नाही..  
नीटनेटकेपणात आहे माझे सौंदर्य..


मी भामिनी मी स्वामिनी मी आहे दामिनी..  
सर्वांच्या हृदयामध्ये वसणारी मी कामिनी..


ना उर्वशी ना मेनका मी नाही शकुन्तला..  
प्रतिभेतून जन्माला आलेली मी ती एक कविता..



हो... तीच मी

Thursday, 7 April 2016


            धुंदली रात ही          
                    

हा चंद्रमा या जीवनी 
देई मला संजीवनी
रात्रीस हा येई संगमा 
साथ देते तुला ही चांदणी.. 


शीत वारा तुला शीळ घालतो
वा-यासवे हा वृक्ष डोलतो
श्वासातुनी झंकारली 
शृंगारली ही रागिणी .. 
माळावरी गालावरी
हासती फुले गोडगोजिरी...1

हा चंद्रमा ही चांदणी 
देई मला संजीवनी..


रेखावली तुझी भारावली
माझ्यासवे ती नादावली
प्रीतीत ही धुंदावली
रंगावली तुझी ऐसी रंगली.. 
रंगून दे मला रंगांसवे 
माझ्या मनीच्या गोड पाखरा.. 2

हा चंद्रमा ही चांदणी 
देई मला संजीवनी...


सर्व सार हे असार वाटू लागले
भारलेल्या मनास तूच तारले
असे शहारले उरी तरारले
तरंगातुनि बहार मन्मनी फुले.. 
गंधासवे बंधामध्ये
माझ्या मनास या सदा न्हाऊ दे.. 3

हा चंद्रमा ही चांदणी 
देई मला संजीवनी...

                                      श्रीहरी

धुंदली रात ही



।। किमया गुरुदेवांची ।।
                

आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदी आनंद झाले ।
आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदामृतात न्हाले ।। धृ ।।


गुरुदेवांचा ऐसा मान, 
गुरुदेवांचे करावे ध्यान
गुरुदेवांचे अजोड ज्ञान, 
गुरुदेवांची ऐसी शान
गुरुदेवांना आसन द्यावे
आले आले हो गुरुदेव आले ।।1।।


संसाराचे पोषण करण्या, 
दीनांचे दुःख हरण्या,
सर्वांना तृप्त करण्या, 
अन्नपूर्णेला तुष्ट करण्या,
गुरुदेवांना भोजन द्यावे
आले आले हो गुरुदेव आले ।।2।।


गुरुदेवांची वाणी ऐसी,
अमृताते ही पैजा जिंकी,
चितिशक्तीला जागवी,
सिद्ध महायोगी घडवी,
गुरुदेवांना कोटि नमावे
आले आले हो गुरुदेव आले ।।3।।


आले हो ऽऽ आले 
गुरुदेव अमुच्या सदनी आले ।
आले हो ऽऽ आले 
गुरुदेव अमुच्या भवनी आले ।।


आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदी आनंद झाले ।
आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदामृतात न्हाले ।। धृ ।।
                                                            श्रीहरी

।। किमया गुरुदेवांची ।।



।। माझी माऊली ।। 

   नित्यानंद नारायण, मुक्तानंद हरी ।

उमानंद शिवशंकर, गुरू जगा तारी ।।धृ ।।


दिला आसरा हो तुम्ही, मायपित्याचा

संकटात धावुनि आला, गुरुदेव माझा
बाळ मानुनि हो केला, अमुचा लडिवाळा
उमानंद गुरू अमुचा, शिव सांब भोळा  ..1


गुरुमाऊली तू अमुची, ज्ञानमाऊली तू

अज्ञानाचा नाश करी, देववाणी तू
अमृतात न्हाऊनि गेले, मन हे अजाण
श्वास माझा तूच तू अन् तूच माझा प्राण.. 2


अंतरंगा व्यापियले तू , बाह्य अंगाही

सर्वकाही व्यापुनि ठेला, सूक्ष्मादि जीवी
गुरूची महती गाता, नको अन्नपान
दर्शन दे मज नाथा, व्याकुळ हे मन..3


जय जय नित्यानंद, जय जय मुक्तानंद

जय जय उमानंद, माऊली ..

।। माझी माऊली ।।

Sunday, 11 October 2015

।। गंगापंचक ।।
श्रीहरि

गौरवान्वित गौरीशाची गौरगंगा गौरवी ।
पुण्यदात्र्यपुण्यहर्त्री शांकरीशा शांभवी ।।

दाट वाटा त्या जटांच्या घाटलाटा छाटुनि ।
काननातील पावकाचे प्राण घेऊन चालली ।।

औषधांची रास मोठी दिव्यता पोटातुनि ।
गौरीजनकाच्या कडूनि भेट घेऊन चालली ।।

रोगहर्त्री भोगदात्री योगनेत्री रक्षिणी ।
शुद्धपावनमायभू गाई तुझी ही थोरवी ।।

तो रवी तो चंद्रमा ते धन्य झाले देवही ।
जह्नुकन्या जाह्नवीला नम्य झाला श्रीहरी ।।

( Marathi poem)

।। गंगापंचक ।। ( Marathi poem)

 
SANSKRIT SHREE: © 2015 - Blogger Templates Designed by Templateism.com