।। गंगापंचक ।।
श्रीहरि
गौरवान्वित गौरीशाची गौरगंगा गौरवी ।
पुण्यदात्र्यपुण्यहर्त्री शांकरीशा शांभवी ।।
दाट वाटा त्या जटांच्या घाटलाटा छाटुनि ।
काननातील पावकाचे प्राण घेऊन चालली ।।
औषधांची रास मोठी दिव्यता पोटातुनि ।
गौरीजनकाच्या कडूनि भेट घेऊन चालली ।।
रोगहर्त्री भोगदात्री योगनेत्री रक्षिणी ।
शुद्धपावनमायभू गाई तुझी ही थोरवी ।।
तो रवी तो चंद्रमा ते धन्य झाले देवही ।
जह्नुकन्या जाह्नवीला नम्य झाला श्रीहरी ।।
( Marathi poem)
Post a Comment