Saturday, 9 April 2016



पती हाच परमेश्वर???

आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत 'पती हाच परमेश्वर' असे म्हटले जाते. हे किती खरे याचा इतिहास जाणून घेण्याऐवजी मूळ संकल्पना जाणून घेणे हितावह आहे.

आजवर 'पती हाच परमेश्वर' हा उपदेश हिंदू समाजात प्रत्येक स्त्रीला देण्यात आलेला आहे. पूर्वीच्या काळी या वचनाचे तंतोतंत पालन स्त्रियांनी केले. पण आजची सुजाण स्त्री या असल्या भ्रामक संकल्पनांना तिलांजली देते आणि स्त्रीपुरुष समान या तत्त्वाचा अवलंब करते .

पती हाच परमेश्वर???

Superbrain Yoga

Thursday, 7 April 2016


            धुंदली रात ही          
                    

हा चंद्रमा या जीवनी 
देई मला संजीवनी
रात्रीस हा येई संगमा 
साथ देते तुला ही चांदणी.. 


शीत वारा तुला शीळ घालतो
वा-यासवे हा वृक्ष डोलतो
श्वासातुनी झंकारली 
शृंगारली ही रागिणी .. 
माळावरी गालावरी
हासती फुले गोडगोजिरी...1

हा चंद्रमा ही चांदणी 
देई मला संजीवनी..


रेखावली तुझी भारावली
माझ्यासवे ती नादावली
प्रीतीत ही धुंदावली
रंगावली तुझी ऐसी रंगली.. 
रंगून दे मला रंगांसवे 
माझ्या मनीच्या गोड पाखरा.. 2

हा चंद्रमा ही चांदणी 
देई मला संजीवनी...


सर्व सार हे असार वाटू लागले
भारलेल्या मनास तूच तारले
असे शहारले उरी तरारले
तरंगातुनि बहार मन्मनी फुले.. 
गंधासवे बंधामध्ये
माझ्या मनास या सदा न्हाऊ दे.. 3

हा चंद्रमा ही चांदणी 
देई मला संजीवनी...

                                      श्रीहरी

धुंदली रात ही



।। किमया गुरुदेवांची ।।
                

आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदी आनंद झाले ।
आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदामृतात न्हाले ।। धृ ।।


गुरुदेवांचा ऐसा मान, 
गुरुदेवांचे करावे ध्यान
गुरुदेवांचे अजोड ज्ञान, 
गुरुदेवांची ऐसी शान
गुरुदेवांना आसन द्यावे
आले आले हो गुरुदेव आले ।।1।।


संसाराचे पोषण करण्या, 
दीनांचे दुःख हरण्या,
सर्वांना तृप्त करण्या, 
अन्नपूर्णेला तुष्ट करण्या,
गुरुदेवांना भोजन द्यावे
आले आले हो गुरुदेव आले ।।2।।


गुरुदेवांची वाणी ऐसी,
अमृताते ही पैजा जिंकी,
चितिशक्तीला जागवी,
सिद्ध महायोगी घडवी,
गुरुदेवांना कोटि नमावे
आले आले हो गुरुदेव आले ।।3।।


आले हो ऽऽ आले 
गुरुदेव अमुच्या सदनी आले ।
आले हो ऽऽ आले 
गुरुदेव अमुच्या भवनी आले ।।


आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदी आनंद झाले ।
आले आले हो गुरुदेव आले 
मन आनंदामृतात न्हाले ।। धृ ।।
                                                            श्रीहरी

।। किमया गुरुदेवांची ।।



।। माझी माऊली ।। 

   नित्यानंद नारायण, मुक्तानंद हरी ।

उमानंद शिवशंकर, गुरू जगा तारी ।।धृ ।।


दिला आसरा हो तुम्ही, मायपित्याचा

संकटात धावुनि आला, गुरुदेव माझा
बाळ मानुनि हो केला, अमुचा लडिवाळा
उमानंद गुरू अमुचा, शिव सांब भोळा  ..1


गुरुमाऊली तू अमुची, ज्ञानमाऊली तू

अज्ञानाचा नाश करी, देववाणी तू
अमृतात न्हाऊनि गेले, मन हे अजाण
श्वास माझा तूच तू अन् तूच माझा प्राण.. 2


अंतरंगा व्यापियले तू , बाह्य अंगाही

सर्वकाही व्यापुनि ठेला, सूक्ष्मादि जीवी
गुरूची महती गाता, नको अन्नपान
दर्शन दे मज नाथा, व्याकुळ हे मन..3


जय जय नित्यानंद, जय जय मुक्तानंद

जय जय उमानंद, माऊली ..

।। माझी माऊली ।।

Tuesday, 5 April 2016

 
SANSKRIT SHREE: © 2015 - Blogger Templates Designed by Templateism