।। किमया गुरुदेवांची ।।
आले आले हो गुरुदेव आले
मन आनंदी आनंद झाले ।
आले आले हो गुरुदेव आले
मन आनंदामृतात न्हाले ।। धृ ।।
गुरुदेवांचा ऐसा मान,
गुरुदेवांचे करावे ध्यान
गुरुदेवांचे अजोड ज्ञान,
गुरुदेवांची ऐसी शान
गुरुदेवांना आसन द्यावे
आले आले हो गुरुदेव आले ।।1।।
संसाराचे पोषण करण्या,
दीनांचे दुःख हरण्या,
सर्वांना तृप्त करण्या,
अन्नपूर्णेला तुष्ट करण्या,
गुरुदेवांना भोजन द्यावे
आले आले हो गुरुदेव आले ।।2।।
गुरुदेवांची वाणी ऐसी,
अमृताते ही पैजा जिंकी,
चितिशक्तीला जागवी,
सिद्ध महायोगी घडवी,
गुरुदेवांना कोटि नमावे
आले आले हो गुरुदेव आले ।।3।।
आले हो ऽऽ आले
गुरुदेव अमुच्या सदनी आले ।
आले हो ऽऽ आले
गुरुदेव अमुच्या भवनी आले ।।
आले आले हो गुरुदेव आले
मन आनंदी आनंद झाले ।
आले आले हो गुरुदेव आले
मन आनंदामृतात न्हाले ।। धृ ।।
श्रीहरी
Post a Comment