Tuesday, 28 February 2017



हो... तीच मी
                   श्रीहरी
 

अखिल मानवजातीला मी आहे एक वरदान..  
 माझ्यामुळेच सृष्टी घडते मी विश्वाचा प्राण..


माझ्या सौंदर्याऽऽपुढे ते शूरवीर झुकतात...
 सज्जन साधू ऋषीमुनीही माझे गुण गातात..


गती माझी आकर्षक अन् चाल डौलदार..
माझे पदलालित्य पाहुनि झाले किती बेजार..


माझ्या नयनडोहामध्ये किती आकंठ बुडाले..  
माझ्या कोमल स्पर्शाने कित्येक सुखावले..


पण आहे मी शिस्तप्रिय माझ्या नियमांनी बद्ध..  
स्वैरपणे मी ना फिरते मी नाही छंदिष्ट..


तालबद्ध मी आहे नित्य, मधुरपाक मी आहे..  
नृत्य वाद्य अन् संगीताला अनुकूल मी आहे..


भरगच्च लोकलमधून बाहेर पडलेली मी नाही..  
नीटनेटकेपणात आहे माझे सौंदर्य..


मी भामिनी मी स्वामिनी मी आहे दामिनी..  
सर्वांच्या हृदयामध्ये वसणारी मी कामिनी..


ना उर्वशी ना मेनका मी नाही शकुन्तला..  
प्रतिभेतून जन्माला आलेली मी ती एक कविता..



हो... तीच मी






भरतमुनिविरचितं नाट्यशास्त्रम् ।
पदच्छेद आणि अन्वयासह मराठी अनुवाद


Image may contain: 2 people, people smiling, people on stage, people standing, concert and indoor


जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे एक अनोखा सोहळा 27 फेब्रुवारी 2017 रोजी गेट वे ऑफ इंडिया,  मुंबई  येथे संपन्न झाला. मराठी सिनेतारकांनी सजलेल्या या कार्यक्रमात अनेक मराठी कवी आणि लेखकांना विविध पुरस्कारांनी गौरविले गेले.  त्याच सोहळ्यात 11 नवीन पुस्तकांचे प्रकाशन झाले.  त्यांपैकी एक होते भरतमुनिविरचित नाट्यशास्त्राच्या मराठी अनुवादाचा पहिला खंड.  हा अनुवाद केला आहे डाॅ.  संध्या पुरेचा आणि श्री. श्रीहरी गोकर्णकर यांनी.

यात 1 ते 12 अध्याय समाविष्ट आहेत.  अभ्यासकांच्या सोयीसाठी पदच्छेद आणि अन्वय देऊन त्यानंतर मराठी भाषांतर दिले आहे.  अशा स्वरूपाचे कार्य मराठी भाषेत आजतागायत झालेले नाही.  म्हणून या कार्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,  मुंबई यांनी छापल्याने त्याचे महत्त्व द्विगुणित झाले आहे. 

सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्वानांनी याचे अध्ययन करून आपला अभिप्राय आणि सूचना नक्की कळवा म्हणजे पुढील खंडात त्यांचा समावेश करता येईल. 

 सर्व गुरुजनांना माझे शिरसा अभिवंदन. 



श्री. श्रीहरी गोकर्णकर
























































































भरतमुनिविरचितं नाट्यशास्त्रम् ।

 
SANSKRIT SHREE: © 2015 - Blogger Templates Designed by Templateism.com