09:40
Marathi translated song
Tuesday, 15 August 2017
Tuesday, 28 February 2017
हो... तीच मी
श्रीहरी
अखिल मानवजातीला मी आहे
एक वरदान..
माझ्यामुळेच सृष्टी घडते मी विश्वाचा प्राण..
माझ्यामुळेच सृष्टी घडते मी विश्वाचा प्राण..
माझ्या सौंदर्याऽऽपुढे ते शूरवीर
झुकतात...
सज्जन साधू ऋषीमुनीही माझे गुण गातात..
सज्जन साधू ऋषीमुनीही माझे गुण गातात..
गती माझी आकर्षक
अन् चाल डौलदार..
माझे पदलालित्य पाहुनि झाले किती बेजार..
माझे पदलालित्य पाहुनि झाले किती बेजार..
माझ्या नयनडोहामध्ये किती आकंठ
बुडाले..
माझ्या कोमल स्पर्शाने कित्येक सुखावले..
माझ्या कोमल स्पर्शाने कित्येक सुखावले..
पण आहे मी
शिस्तप्रिय माझ्या नियमांनी बद्ध..
स्वैरपणे मी ना फिरते मी नाही छंदिष्ट..
स्वैरपणे मी ना फिरते मी नाही छंदिष्ट..
तालबद्ध मी आहे
नित्य, मधुरपाक मी आहे..
नृत्य वाद्य अन् संगीताला अनुकूल मी आहे..
नृत्य वाद्य अन् संगीताला अनुकूल मी आहे..
भरगच्च लोकलमधून बाहेर पडलेली
मी नाही..
नीटनेटकेपणात आहे माझे सौंदर्य..
नीटनेटकेपणात आहे माझे सौंदर्य..
मी भामिनी मी
स्वामिनी मी आहे
दामिनी..
सर्वांच्या हृदयामध्ये वसणारी मी कामिनी..
सर्वांच्या हृदयामध्ये वसणारी मी कामिनी..
ना उर्वशी ना
मेनका मी नाही
शकुन्तला..
प्रतिभेतून जन्माला आलेली मी ती एक कविता..
प्रतिभेतून जन्माला आलेली मी ती एक कविता..
हो... तीच मी
08:31
marathi poetry
Friday, 13 January 2017
Subscribe to:
Posts (Atom)